नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे पाटील , समर्थकांमध्ये उत्साह

शेअर करा

नगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियुक्तीनंतर भाजपला आता स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्ह्यात वर्चस्व दाखवण्याची संधी चालून आलेली आहे. 

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल दहा जागा महायुतीने जिंकलेल्या होत्या. पारनेर तालुक्यात काशिनाथ दाते यांना निवडून आणण्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा हात होता. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जिल्हाव्यापी राजकारणाची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष हा जुना असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच प्रामुख्याने मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होताच विखे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.


शेअर करा