कोपरगाव शहरात गोमांस विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकाने एकाच वेळी सर्वत्र छापे टाकत तब्बल एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने व मांसविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहा वाजल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आणि शहरातील संजयनगर , आयेशा कॉलनी , हाजी मंगल कार्यालय परिसर इथे हे छापे टाकण्यात आले . गोमांस विक्री करणाऱ्यांची दुकाने उध्वस्त करण्यात आली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली असून 13 पोलीस कर्मचारी आणि दोन महिला पोलीस या कारवाईत सहभागी झालेले होते.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी यासंदर्भात बोलताना ,’ बेकायदा गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांवर या पुढील काळात कुठलीही गय केली जाणार नाही. कायद्याने बंदी असणाऱ्या कोणत्याही जनावराची मांस विक्री करताना कोणी आढळून आले तर त्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल ,’ असे म्हटले आहे.