भारतापाठोपाठ ‘ ह्या ‘ देशात देखील टिकटॉकला बंदी 

शेअर करा

भारतापाठोपाठ आता टिकटॉकवर अमेरिकेत देखील बंदी घालण्यात आलेली आहे. टिक टॉकने अमेरिकेतील काम थांबवलेले असून एप्पलने देखील त्यांच्या प्लेस्टोर मधून हे ॲप काढून टाकलेले आहे. 17 जानेवारीला अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने देखील टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिलेली होती. 

एफबीआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , tiktok कंपनीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चीनचे सरकार अमेरिकेतील उपकरणांपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एप्रिल 2024 मध्ये यासंदर्भात कायद्यावर स्वाक्षरी केलेली होती. 

tiktok कंपनीची मूळ कंपनी असलेल्या बाईट डान्स या कंपनीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती मात्र 17 जानेवारीला त्यांची याचिका फेटाळण्यात आली त्यानंतर टिक टॉकने अखेर 19 जानेवारीपासून अमेरिकेत काम करणे बंद केलेले आहे. 

टिक टॉक ज्या पद्धतीने मोबाईलधारकांचा डाटा जमा करते त्याच पद्धतीने अमेरिकन कंपनी मेटा आणि गुगल यांच्यासोबत इतरही सोशल मीडिया कंपन्या युजरचा डाटा , कीवर्ड स्ट्रोक्स , सर्च करत असलेली माहिती , जास्त पाहिले गेलेले व्हिडिओ या संदर्भात सर्व माहिती जमा करत असतात मात्र हेच कारण देऊन टिक टॉकवर अमेरिकेत बंदी घालण्यात आलेली आहे. 


शेअर करा