सोशल मीडियावर सध्या कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणाऱ्या एका तरुणीची जोरदार चर्चा सुरू असून मध्य प्रदेशातील इंदूरची ही तरुणी आहे. तिचे नाव मोनालिसा असे असून तिच्या सुंदर डोळ्यामुळे ती चर्चेत आलेली आहे. एका युट्युबरने तिची मुलाखत घेतली आणि त्यानंतर सोशल मीडियावरती ती जोरदार व्हायरल झाली.
ब्राऊन ब्युटी म्हणून तिचा सोशल मीडियावर उल्लेख केला जात असून कुंभमेळ्यात ती रुद्राक्ष विकत होती. एका युट्युब चॅनेलने तिचा व्हिडिओ बनवला आणि तो प्रचंड लोकप्रिय झाला त्यानंतर तिला भेटण्यासाठी अनेक जण येऊ लागले. रुद्राक्ष विकणे बाजूला राहिले मात्र सोशल मीडियावर मुलाखत देण्यासाठीच ती उपलब्ध होत नसल्याचे चित्र निर्माण झाले.
मोनालिसा ही अत्यंत गरीब कुटुंबातील असून इंदूरमधील एका झोपडपट्टीत राहते. तिच्या वडिलांनी अखेर या प्रकरणाची दखल घेत तिला घरी पाठवलेले असून तिच्या दोन्ही बहिणी आता रुद्राक्षाच्या माळा विकत आहेत.