अन सद्दामचा झाला शिवशंकर सोनी , मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात केला प्रवेश

शेअर करा

हिंदू धर्मातील प्रेयसीसी विवाह करण्यासाठी एका तरुणाने मुस्लिम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला असून त्याचे वय 34 वर्षे आहे. उत्तर प्रदेशातील बस्ती येथील हे प्रकरण आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सद्दाम नावाचा एक तरुण एका हिंदू युवतीच्या प्रेमात पडलेला होता मात्र काही कालावधीनंतर त्यांच्यात वादही सुरू झाले आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या विरोधात पोलिसात देखील तक्रार दिली होती मात्र त्यानंतर त्यांच्यात समझोता झाला आणि तरुणाने सद्दाम नाव बदलून शिवशंकर सोनी नाव धारण करत हिंदू धर्मात प्रवेश केला. उत्तर प्रदेशात या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे. 

रविवारी रात्री, सद्दाम आणि मुलीचे हिंदू रितीरिवाजांनुसार शहरातील बाजारपेठेतल्या एका मंदिरात लग्न झाले आणि सद्दामने त्याचे नाव बदलून शिवशंकर सोनी असे केले. दोघांनी मंदिरात सात फेऱ्या मारल्या आणि एकत्र आयुष्य घालवण्याबाबत चर्चा केली. दोघांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे. “आम्ही गेल्या दहा वर्षांपासून प्रेमात होतो”, असे ते म्हणाले होते.


शेअर करा