त्रिपुरा मेघालय आणि मणिपूर या तिन्ही राज्यांनी त्यांचा 53 वा स्थापना दिवस साजरा केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा देखील दिल्या. काँग्रेसकडून मोदी यांना पुन्हा निशाण्यावर धरण्यात आलेले असून अशांतता असताना मोदी एकदाही मणिपूरला गेलेले नाहीत , अशी टीका करण्यात आली आहे.
ईशान्य भारताची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यानंतर मणिपूर , मेघालय आणि त्रिपुरा यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. आसामपासून विभक्त करून मेघालय बनवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर त्रिपुरा , मेघालय , मणिपूर या राज्यांनी केवळ सांस्कृतिक वैविध्य नव्हे तर देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अमूल्य योगदान दिलेले आहे , असे म्हटलेले होते.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींवर टीका करताना , ‘ तीन मे 2023 पासून मणिपूरमध्ये संघर्ष सुरू आहे मात्र मोदी यांनी एकदाही राज्याला भेट दिली नाही. जगभर प्रवास करणाऱ्या मोदींकडे मणिपूरच्या लोकांसाठी वेळ कधीच नव्हता. मुख्यमंत्री खासदार आणि सामाजिक संघटनांशी देखील त्यांनी कधीच कुठली चर्चा केली नाही. मणिपूरला दिलेल्या शुभेच्छा हे केवळ पंतप्रधानांच्या दिखाऊपणाचे प्रतीक आहे, ‘ असेही त्यांनी म्हटले आहे.