ब्रेकिंग…निम्मे शहर बंद ठेवूनही नगरमध्ये आज तब्बल ‘इतक्या ‘ रुग्णांची भर

शेअर करा

देशभरात कोरोना थैमान घालत असताना सुरुवातीला नगरचे आकडे खूप कमी होते मात्र त्यात आता भर पडू लागली असून कोरोनाचे वाढते आकडे ही नागरिकांची व प्रशासनाची चिंता वाढवणारे आहेत . आजच्या ताज्या बातमीनुसार, नगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे . त्यामुळे आज नवीन ९ रुग्णांची कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडली आहे .

शहरातील माळीवाडा भाग यापूर्वीच सील केला असून आता कोठी परिसरातही रुग्ण सापडू लागले आहेत . निम्मे शहर कोरोनामुळे याआधीच प्रतिबंधित असून देखील रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे . आजच्या आकडेवारीनुसार, नगर शहरातील तीन, स्टेशनरोड येथील एका 71 वर्षीय पुरुषाचा कोरोनाबाधितामध्ये समावेश आहे. कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित असल्याचे आजच्या अहवालातून स्पष्ट झाले. पाथर्डीतील चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेले 40 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय मुलगा यांना कोरोनाची लागण आहे. राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे येथील 32 वर्षीय युवक बाधित असून, यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे.

मागील पंधरा दिवसांपासून शहरातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काल एकाच दिवशी 18 रुग्ण आढळले होते. आज दुपारपर्यंतच नऊ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. आज सायंकाळीही अहवाल प्राप्त होणार असून, त्यामध्ये आणखी काही रुग्ण आढळू शकतात, अशी जिल्ह्यातील परिस्थिती आहे.

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील १४ व्यक्ती आज कोरोनामुक्त देखील झाल्या असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात राहाता तालुका ०५, अकोले तालुका ०२, संगमनेर तालुका ०३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे . आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत .


शेअर करा