नगरमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढिगारे आणि मोकाट जनावरे , आयुक्तसाहेब पाहताय ना नगरची अवस्था ?

शेअर करा

नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे काही नागरिक पाळीव जनावरे रस्त्यावर सोडत असल्याने अपघाताचा देखील धोका निर्माण झालेला आहे. विशेष बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधण्याचा  देखील प्रकार सुरू असून अशा मालकांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. 

नगरमध्ये पुन्हा एकदा नव्याने कचऱ्याचे ढिगारे दिसण्यास सुरू झालेले असून शहरासह उपनगरात अनेक ठिकाणी घंटागाडीचे व्यवस्थापन कोलमडलेले पाहायला मिळत आहे.  मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी गेल्या काही महिन्यात आक्रमक पावले उचलली होती मात्र आता घंटागाडीचे व्यवस्थापन पुन्हा कोलमडले असल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईविषयी नागरिकांची संमिश्र अशी भूमिका पाहायला मिळत आहे मात्र मोकाट जनावरांचा प्रश्न अद्याप महापालिकेने सोडून दिल्यात जमा आहे. भररस्त्यात उभी राहणारी जनावरे आणि रात्री अपरात्री पाठलाग करणारी कुत्री असे भयाण चित्र सध्या नगर शहरात निर्माण झालेले आहे.महापालिकेचा कोंडवाडा विभाग प्रत्यक्षात अस्तित्वात असला तरी प्रत्यक्षात काय काम करतो याचे उत्तर मात्र कुणाकडेच नाही. 


शेअर करा