खासदार निलेश लंके यांनी महापालिका कार्यालयात आढावा बैठक घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केलेली आहे सोबतच शहरातील गॅस पाईपलाईनचे काम चार महिन्यात पूर्ण करण्याच्या देखील निलेश लंके यांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत .
खासदार निलेश लंके यांनी शहरातील इतरही सफाई कामगार , नेहरू मार्केट , भाजी विक्रेते , गॅस पाईपलाईन , गाळेधारकांची भाडेवाढ या विषयांवर देखील मनपा प्रशासनाशी चर्चा केली आणि यासंदर्भात मनपा प्रशासनाला सरकारचे निर्णय तसेच न्यायालयाच्या आदेशाची प्रत देखील दिली आहे आयुक्त सकारात्मक निर्णय घेत नाहीत त्यामुळे राज्याच्या प्रधान सचिवांशी देखील आपण फोनवर चर्चा केलेली आहे असे लंके यांनी बैठकीत सांगितले.
शहरातील चार प्रभागांमध्ये गॅस पाईपलाईन साठी महापालिकेने कामाला परवानगी दिली मात्र काम अद्यापही पूर्ण झालेले नाही सोबतच नेहरू मार्केटच्या जागेत महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार असून त्या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात यावे सोबतच गाळेधारकांच्या भाडेवाढीचा प्रश्न नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे यावर देखील तात्काळ तोडगा काढावा अशीही लंके यांनी मागणी केलेली आहे.