चारचाकी स्वतःसाठी की सरकारची तिजोरी भरण्यासाठी , आता पुन्हा नवीन भूत मानगुटीवर

शेअर करा

चारचाकी वाहनांवरील वेगवेगळ्या कर आणि नियम पाहता नक्की वाहन माणसासाठी आहे की माणूस वाहनासाठी अशी परिस्थिती देशभरात निर्माण झालेली आहे. आता जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे बंधनकारक केलेले असून एक एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना ही सक्ती करण्यात आलेली आहे मात्र नवीन नंबर प्लेट लावताना इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक दर हे महाराष्ट्रात आकारले जाणार आहेत , हे दर कमी करावेत अशी मागणी जनमंच या सामाजिक संघटनेने केलेली आहे. 

जनमंच संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक दिलेले असून त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ,’ नंबर प्लेट बदलण्याच्या संपूर्ण कामाची किंमत कंत्राटामध्ये 600 कोटी रुपये दाखवण्यात आलेले आहे. वाहनांची संख्या पाहता ती पंधराशे कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता असून कंत्राटामधील अटी देखील नागरिकांसाठी प्रचंड अडचणीच्या आहेत. सर्व प्रकाराची सारासार चौकशी करून गुजरात राज्याच्या दराएवढेच दर महाराष्ट्रात निश्चित करण्यात यावेत ,’ असेही त्यांनी म्हटलेले आहे. प्रशासनाकडून 31 मार्चपर्यंत नवीन नंबर प्लेटसाठी मुदत देण्यात आलेली आहे. 

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे बंधनकारक केलेले असून तीन संस्थांना हे काम दिले जाणार आहे. प्रत्येक आरटीओ कार्यालयाच्या अंतर्गत त्यांना स्वतःची फ्रँचायसी सुरू करून त्यानंतर या नंबर प्लेट बसवायच्या आहेत.


शेअर करा