नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यात शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळा समोर आलेला असून या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर कवडे याचा अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळलेला आहे. 11 फेब्रुवारी पर्यंत त्याला पोलिसांसमोर येण्यास मुदत देण्यात आलेली आहे.
शेवगाव तालुक्यातील राक्षी गावात राजू दोडके नावाच्या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेली होती मात्र भाऊसाहेब कवडे , ज्ञानेश्वर कवडे व इतर व्यक्तींनी त्यांची फसवणूक केली आणि तब्बल 63 लाख 70 हजार रुपये हडप केले.
राजू दोडके यांनी त्यानंतर आरोपींच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि एमपीआयडी कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा देखील दाखल झाला. ज्ञानेश्वर कवडे याने त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केलेला होता मात्र त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे .