अहिल्यानगर महापालिकेकडून अखेर ‘ त्या ‘ मेसेजविषयी स्पष्टीकरण , फॉरवर्ड कराल तर कारवाईचा इशारा..

शेअर करा

नगर शहरात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमधून ‘ विशेष सूचना महापालिकेकडून सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे ,’ असा मेसेज व्हायरल झालेला आहे

सदर मेसेज हा खोटा आणि खोडसाळपणाचा असून असा कुठलाही बिघाड झालेला नाही. शहरवासीयांची खोट्या मेसेजद्वारे दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अखेर महापालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून दिलेला आहे .


शेअर करा