तब्बल एक कोटी 26 लाख कुटुंबियांच्या अन मित्राच्या खात्यात ट्रान्स्फर , नगरमध्ये फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सरकारी ठेकेदाराच्या संस्थेतील एका लिपिक व्यक्तीने पत्नी आणि मित्रांसोबत संगनमत करून तब्बल एक कोटी 26 लाख 12 हजार रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आलेली आहे. तोफखाना पोलिसात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , श्रीराम बाळासाहेब फुंदे , कांचन श्रीराम फुंदे आणि महेश जावळे ( तिघेही राहणार लोहारवाडी तालुका नेवासा ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर संदीप सुधाकर भापकर ( वय 46 राहणार दिल्लीगेट ) यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

संदीप सुधाकर भापकर यांच्या एस आर कन्स्ट्रक्शन इथे आरोपी श्रीराम फुंदे हा नोकरी करत होता. 2018 पासून तर सर्व आर्थिक व्यवहार तो पहायचा आणि इतर कर्मचारी त्याला मदत करत असायचे. आर्थिक व्यवहारात जुळवाजुळव होत नसल्याने भापकर यांना शंका आली त्यानंतर ही बाब समोर आली. 

भापकर यांनी इतरही काही व्यक्तींकडे चौकशी केली त्यावेळी भापकर यांच्या खात्यातून पैसे वजा झालेले होते मात्र समोरील व्यक्तीला मिळालेले नव्हते तेव्हा आरोपी श्रीराम फुंदे याने स्वतःच्याच बँक खात्यात तसेच त्याची पत्नी आणि मित्रांच्या खात्यात सुमारे एक कोटी 26 लाख 12 हजार रुपये ट्रान्सफर केल्याची बाब समोर आली.


शेअर करा