नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार बोल्हेगाव परिसरात समोर आलेला असून राहत्या घराच्या छताच्या फॅनला साडीने गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तीस जानेवारी रोजी सकाळी ही घटना बोल्हेगाव परिसरात घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुरज बाजीराव गजरे ( वय 21 वर्ष राहणार मनोलीला नगर बोल्हेगाव ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचे वडील बाजीराव गजरे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता .