भाग्यश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथील तब्बल २१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील एका आरोपीला एमआयडीसी पोलीस आणि सोनई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , वैभव बाळासाहेब विधाते ( वय 33 राहणार अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुसरा संशयित आरोपी भारत बबन पुंड व त्याच्या साथीदारांवर गुंतवणूकदारांना भाग्यश्री मल्टीस्टेटमध्ये उत्तम परताव्याचे आमिष दाखवत 350 जणांची फसवणूक करत केल्याचा आरोप आहे.
सर्व आरोपींनी मिळून तब्बल 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि गुंतवणूकदारांना परतफेड न करता सोसायटीच्या शाखा बंद केल्या. अटक करण्यात आलेला वैभव विधाते हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झालेला होता त्याला सोनई पोलिसांच्या मदतीने सोनईतून अटक करण्यात आली .