अखेर  ‘ त्या ‘ जखमी तरुणाला पुण्याला हलवलं , 18 जानेवारी रोजी रात्री.. 

शेअर करा

नगरमध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार नवनागापूर इथे समोर आलेला आहे. धारदार शास्त्राने तरुणाच्या छातीत वार करून त्याला जबर जखमी करण्यात आले असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , 18 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना एमआयडीसीतील सह्याद्री चौकात ही घटना घडलेली होती. विश्वास पोपट सोनवणे ( राहणार अबोली कॉलनी नवनागापूर ) असे घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

लखन नानासाहेब कर्जुले ( राहणार तामसवाडी तालुका नेवासे ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव असून लखन याने कोणत्या कारणावरून विश्वास सोनवणे याच्यावर हल्ला केला हे अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. जखमी तरुणावर पुण्यात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे . 


शेअर करा