बॉलिवूडची अभिनेत्री ममता कुलकर्णी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनल्यानंतर किन्नर आखाड्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू झालेली होती मात्र ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी हा निर्णय जाहीर केलेला असून ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वरपदी विराजमान करण्याचा निर्णय घेणारे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची देखील किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वरपदी नियुक्त करून धर्मद्रोह केलेला आहे असे ऋषी अजय दास यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलेले आहे.