नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा , बुरखा बंदीवरून उत्कर्षाताई रुपवते यांनी नितेश राणेंना सुनावलं

शेअर करा

परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी अशी मागणी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेली होती.  वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रूपवते यांनी याप्रकरणी नितेश राणे यांनी ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवावी नको त्या भानगडीत पडू नये , असा सल्ला दिलेला आहे. 

काय म्हणाल्या उत्कर्षाताई रूपवते ? 

कुठल्याही समुदायाची प्रगती थांबवायची असेल तर त्यांच्या ‘स्त्री शिक्षणाच्या’ प्रक्रियेमध्ये खोडा घाला ही विकृती मनुस्मृती पुरस्कृत विचारांची आहे. भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी ‘परीक्षेला बसताना बुरख्यावर बंदी आणावी, त्याने कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल’ अशी हास्यापद मागणी केली असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही मागणी फेटाळत सामाजिक भान राखले आहे . महायुतीचे सरकार जाणीवपूर्वक दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

नितेश राणे यांना महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय व बंदरे यामध्ये खूप काम करण्याचा वाव आहे. ज्या विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे तिथे कामगिरी करून दाखवा. नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यावर लक्ष दिले तर उत्तम होईल.


शेअर करा