अहिल्यानगर महापालिकेच्या पाणीपुरवठ्याबद्दल खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी महापालिकेकडून एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तोफखाना पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , अल्तमश जरीवाला ( राहणार अहिल्यानगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून ,’ विशेष सूचना अहिल्यानगर महापालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीनमध्ये बिघाड झाल्याने पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे. कृपया ही माहिती आपल्या मित्र परिवारांना कळवावी ,’ असा मेसेज त्यांनी शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.