अखेर ‘ त्या ‘ मुलीची राहुरी तालुक्यातून सुटका , २९ तारखेला पहाटे दोनच्या .. 

शेअर करा

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आलेले होते. राहुरी पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केलेली असून आरोपी तरुणाला ताब्यात घेतलेले आहे. पीडित मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलेले असून आरोपीला शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सौरभ धुळे ( वय 19 राहणार शिरूर जिल्हा पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने 29 जानेवारी 2025 रोजी शिरूर तालुक्यातील एका गावातून पहाटे दोनच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेले होते. 

मुलीच्या कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीच्या विरोधात शिरूर पोलिसात गुन्हा नोंदवलेला होता. आरोपी सौरभ हा राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले तर अल्पवयीन मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केलेली आहे. 


शेअर करा