नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना शिर्डीत घडलेली असून शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची अडवून अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे तर आणखीन एक व्यक्ती देखील हल्ल्यात जखमी झाला आहे. विशेष बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या एक तासांच्या आत घडलेल्या असून शिर्डीत यामुळे खळबळ उडालेली आहे .
शिर्डी त आज पहाटेच्या सुमारास सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ हे साई संस्थानमध्ये निघाले होते त्यावेळी आरोपींनी वाटेत अडवून त्यांची निर्घृण हत्या केली तर आणखीन एका हल्ल्यात कृष्णा देहरकर हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर श्रीकृष्णनगर भागात हल्ला झाला आहे .
पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला हे तीन गुन्हे घडले असून अत्यवस्थ असलेले कृष्णा देहरकर यांच्यावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष घोडे हे मंदिरातील साईमंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यावेळी या घटना घडलेल्या आहेत.
मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली मात्र इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी अपघात असल्याचे सांगत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप मयत व्यक्तींच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त करत,’ पोलिसांना अपघात आणि खून यातील फरक कळत नाही, त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील ‘ असे म्हटलेले आहे.