संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भगवानगडाचे महंत म्हणाले की ,’ आज मला खरी.. ‘

शेअर करा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आम्ही पाठीशी घालत नाही तर भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याची ग्वाही भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी देत या सर्व प्रकरणाला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्वांनी प्रार्थना करावी ,’ असे आवाहन केलेले आहे. 

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवानगडावर डॉक्टर नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन आरोपींच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती सोबतच संतोष देशमुख यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती नामदेव शास्त्री यांना दिली होती त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी गडाची भूमिका मांडलेली आहे. 

डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना ,’ संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडाला मानणारे आहे. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय याची माहिती मला आज देण्यात आली त्यासंदर्भात कागदपत्रे देखील मला दाखवण्यात आलेली आहेत. संतोष देशमुख कुटुंबियांची जमीन गेल्या तीन पिढ्यांपासून वंजारी समाज असलेले मुंडे कुटुंबीय कसत आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणाला जातीय रंग न देता आरोपींना खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी असे माझे भगवानबाबाच्या गादीवरून सर्वांना सांगणे आहे ,’ असे म्हटलेले आहे. 

‘ आधीच्या माझ्या बोलण्याचा विपर्यास झालेला असून तो समाजातील काही वाईट लोकांनी केलेला आहे. गुन्हेगार व्यक्तींचे समर्थन मी कदापि करणार नाही. सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा ,’ अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. 


शेअर करा