धनंजय मुंडे-वाल्मिक कराड पाया पडले ? , मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यावेळी..

शेअर करा

‘ संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आम्ही पाठीशी घालत नाही तर भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याची ग्वाही भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी देत या सर्व प्रकरणाला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्वांनी प्रार्थना करावी ,’ असे आवाहन केलेले आहे.

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवानगडावर डॉक्टर नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन आरोपींच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांची माहिती सोबतच संतोष देशमुख यांनी गावात केलेल्या विकास कामांची माहिती नामदेव शास्त्री यांना दिली होती त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी गडाची भूमिका मांडलेली आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी एक देखील एक गौप्यस्फोट केलेला आहे . 

काय म्हणाले मनोज जरांगे ? 

धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि कृष्णा आंधळे हे माझ्याकडे भेटीला आले होते. मी झोपलो होतो, पोरांनी त्यांना सांगितले की, मी झोपलो आहे आणि मी खरंच झोपलो होतो. त्यानंतर मी भेटल्याशिवाय जाणारच नाही, असे त्यांनी सांगितले. मग मी त्यांना भेटायला गेलो. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वचजण मला भेटायला येत होते, तसेच हे देखील आले. निवडणुकीत लक्ष द्या वगैरे बोलले. 

धनंजय मुंडे यानेच माझी आणि वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यापूर्वी आमची ओळख नव्हती. त्यावेळी माहिती नव्हते, यांचे कारनामे काय आहेत नाहीतर यांना उभे देखील केले नसते. यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे तुमच्या पाया पडले का? हा प्रश्न विचारला असता जरांगे म्हणाले की, मी त्यावर काही बोलणार नाही ती निवडणुकीच्या वेळीच प्रक्रियाच असते. पण मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाहीये.

मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी पाहिजे. साधे साधे काम करत नाही, यांच्यामुळे आमचे पोरं आत्महत्या करत आहेत. तुम्ही देता म्हणता आणि देत नाहीत, म्हणजे तुम्ही जाणुनबुजून आमच्या मराठा पोरांच्या आत्महत्येवर राजकारण करत आहात. मराठा समाज हक्काचं आरक्षण मागतोय. मराठा समाजाचे आणखी किती बळी घेता?. मुख्यमंत्री का आरक्षण देत नाहीत? 


शेअर करा