माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आलेली होती मात्र गेल्या पाच वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने शिवभोजन थाळी चालवणे आता केंद्रचालकांना सध्या अवघड झालेले आहे. नगर जिल्ह्यात आता शिवभोजन थाळीची अवघी 39 केंद्र कार्यरत आहेत.
नगर जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणी अनेकदा गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना अनेक कारणांनी भेट द्यावी लागते त्यामध्ये दवाखान्यापासून तर शासकीय कामकाजापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. महागाई सर्वत्र वाढल्यामुळे स्वस्त दरात व्यवस्थित जेवण मिळण्याची देखील आशा राहिली नसल्याने शिवभोजन थाळी ही नागरिकांसाठी अत्यंत गरजेची ठरलेली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नानंतर ही योजना सुरू झाली मात्र त्यानंतर राज्यात सत्ता बदलली आणि कोरोना काळात शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली.सत्तांतर झाल्यावर शिवभोजन थाळी चालवणारा एकही केंद्रचालक समाधानी दिसत नसून अवघी 39 शिवभोजन थाळीचे केंद्रे नगर जिल्ह्यात राहिलेली आहेत . मानवतेच्या भूमिकेतून आम्ही ही योजना चालवली मात्र सातत्याने सरकारकडून शिवभोजन थाळी केंद्र चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आगामी काळात शिवभोजन थाळी केंद्र चालवणे अवघड होणार आहे असे केंद्रचालकांनी म्हटलेले आहे.