सार्वजनिक कार्यक्रमात घुसून चोऱ्या करण्याचे प्रमाण नगर जिल्ह्यात वाढलेले पाहायला मिळत असून राहुरी पोलिसांनी बीड इथे जाऊन कारवाई करत चार जणींना ताब्यात घेतलेले आहे. चारही जणींची राहुरी न्यायालयाने पोलीस कोठडीत चार दिवसांसाठी रवानगी केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , केशर जाधव ( वय 50 राहणार गांधीनगर बीड ), गवळण गायकवाड ( वय 40 राहणार माऊली नगर बीड ), पूजा वाघमारे ( वय 25 राहणार शिरूर तालुका बीड ) आणि पूजा मोहिते ( वय 27 राहणार नेवासा फाटा ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
राहुरी इथे शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी एका महिला भक्ताच्या दागिन्यांची चोरी झाली आणि त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली त्यावेळी या चारही महिला बीड येथे असल्याची माहिती हाती लागली आणि त्यानंतर कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली. अवघ्या 24 तासांच्या आत ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.