एक खळबळजनक असा प्रकार अहिल्यानगर इथे समोर आलेला असून मालमत्ता विकून त्याचे पैसे देण्यासाठी मुलाने वडिलांना मारहाण केली आणि त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या आणि एक लाख रुपये लंपास केले. माळीवाडा परिसरात एक तारखेला पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडलेली असून त्यानंतर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , निलेश पंडित खरपुडे ( राहणार सारसनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचे वडील पंडित नारायण खरपुडे (वय ७० ) यांनी निलेश सकाळी पावणे दहाच्या सुमारास घरी आला आणि अक्षता गार्डन प्रॉपर्टी तात्काळ विकून दे अशी मागणी केली. त्यास आपण नकार दिला म्हणून त्याने आपल्याला मारहाण केली असे सांगत कोतवाली पोलिसात धाव घेतली होती.