संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीषमहाराज मोरे यांचं टोकाचं पाऊल

शेअर करा

संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीषमहाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचा निर्णय घेत आयुष्याचा शेवट केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, लहान बहीण , चुलते आणि आजी असा परिवार आहे.

उपलब्ध माहितीनुसार , शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेलेले होते मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजले तरी बाहेर आले नाहीत म्हणून घरच्यांनी त्यांना आवाज दिला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही म्हणून अखेर दरवाजा तोडण्यात आला. 

आतमध्ये पंख्याच्या हुकाला उपरण्याने त्यांनी गळफास घेतलेला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून त्यामध्ये आर्थिक विवंचनेचा उल्लेख केलेला असून कीर्तनकार आणि शिवचरित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. आरएसएसचे प्रचारक म्हणून देखील ते काम करत होते. 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह होता मात्र त्या आधीच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. 


शेअर करा