राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कारवाईचा धडाका जोरदार सुरू असून राहुरी पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या दुचाकीच्या मागे दादा नावाची फॅन्सी नंबर प्लेट बसवण्यात आलेली होती. संजय ठेंगे यांनी कारवाईचा बडगा उगारत एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई कर्मचाऱ्यावर केली आणि प्रमाणित नंबर प्लेट बसवल्यानंतर दुचाकी पुन्हा या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.
राहुरी पोलीस ठाण्यात वाहनांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल होत असून फॅन्सी नंबर प्लेट लावल्यावरून दुचाकी स्वारांवर कारवाई केली जाते मात्र पोलीस ठाण्यातीलच व्यक्तींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते अशी नागरिकांमध्ये चर्चा होती. राहुरी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस हवालदार बापू फुलमाळी असे कारवाई करण्यात आलेल्या दुचाकी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे .