‘ अशा प्रवृत्तींना गोळ्या घातल्या पाहिजेत ‘ , राहुल सोलापूरकर याची अखेर.. 

शेअर करा

मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याने आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराजांच्या घरातील वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘ अशा प्रवृत्तींना गोळ्या घातल्या पाहिजेत ‘ असे म्हटलेले आहे

उदयनराजे भोसले यांनी या प्रकरणावर बोलताना ,’ राहुल सोलापूरकर कोण आहे ? या मंडळींना लाचेच्या पलीकडे काही माहिती नसते. अशी विधाने करणाऱ्यांना जनतेने दिसेल तेथे ठेचले पाहिजे. अशा विकृतींची होणारी वाढ ही देशाच्या अखंडतेला धोका आहे ,’ असे म्हटलेले आहे. 

राहुल सोलापूरकर याला पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला असून उदयनराजे भोसले यांनी हा पोलीस बंदोबस्त काढून घेण्याची मागणी केली तसेच वादग्रस्त विधान असलेले व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण कठोर कारवाईची मागणी करणार आहोत असेही त्यांनी म्हटलेले आहे. वाद वाढलेला दिसताच राहुल सोलापूरकर याने त्याने केलेल्या विधानाबद्दल माफी मागितलेली आहे. 


शेअर करा