नगर जिल्ह्यात किरकोळ कारणावरून कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पाथर्डीतील तिसगाव येथे समोर आलेला आहे. टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करत तिच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल एक लाख 70 हजारांचा ऐवज एका आरोपीने हिसकावून नेला आहे .
उपलब्ध माहितीनुसार , नवनाथ अण्णासाहेब घावटे ( राहणार सोनई तालुका नेवासा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून फिर्यादी महिला यांनी त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी महिला यात टेलरिंग तसेच माठ आणि कुंड्या विक्रीचा व्यवसाय करत असून ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादी महिला यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी बियर शॉपीचे दुकान टाकण्यासाठी केली होती.
आरोपीने जर तू मला पैसे दिले नाहीत तर सोने तरी दे असे म्हणाला आणि त्यानंतर बाचाबाची सुरू झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिला यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दमदाटी करत आरोपी हा त्यांच्या पर्समधील 80 हजार रुपयांची रोकड आणि ९० हजार रुपयांचे सोने घेऊन तिथून फरार झाला. आरोपीने त्यानंतर फिर्यादी महिला यांना जर पोलिसात गेली तर तुला आणि तुझ्या मुलीला जिवंत ठेवणार नाही अशी ही धमकी दिली. घाबरून गेलेल्या फिर्यादी महिलेने अखेर पोलिसात धाव घेतलेली आहे .