धक्कादायक ..खाण्याच्या मसाल्यात चक्क गाढवाची लीद टाकायचे आणि ‘ म्हणायचे ‘ की ?.

  • by

खाण्याच्या मसाल्यासारख्या पदार्थात गाढवाची लीद आणि घातक रसायनांची भेसळ करण्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात उघड झाला आहे. गाढवाची लीद आणि घातक रसायनांचा वापर करत लोकल बँडचे बनावट मसाले या कंपनीत तयार केले जात होते.मसाल्यात चांदी आणि इतर किंमती आरोग्यवर्धक वस्तूंचा वापर केला जात असल्याचा दावा करण्यात येत होता मात्र हा सारा प्रकार खोटा असल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. कारखान्याचा संचालक अनूप वार्ष्णेय याला संध्या शांतता भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो हिंदू युवा वाहिनीचा उपविभाग प्रमुख आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर कारखाना हा हाथरस पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नवीपूर भागात सुरू होता. छाप्यामध्ये काही स्थानिक ब्रँड्सच्या नावावर पॅक करण्यात येत असलेल्या ३०० किलोग्रॅमहून अधिक बनावट मसाले जप्त करण्यात आले.छाप्यात हे बनावट मसाले तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या गाढवाची लीद, भूसा, अखाद्य हानिकारक रंग आणि रसायने अशा नुकसानकारक गोष्टींचा समावेश असलेले ड्रम देखील आढळून आले आहेत.

भेसळयुक्त मसाल्यांमध्ये धने पूड, लाल मिरचीची पूड, हळद आणि गरम मसाला तयार करण्यात येत होता. मसाला बनवण्यासाठी एकत्रित केलेले सामान देखील मोठ्या प्रमाणात मिळाले आहे.अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेसळयुक्त मसाल्यांचे दीर्घकाळ सेवन केल्यास ते आरोग्यास घातक ठरू शकते. आता हे भेसळयुक्त मसाले कधीपासून तयार होत होते आणि त्यांचा पुरवठा कुठे कुठे होत होता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे पाहिल्यानंतर विविध पथके तयार वितरीत करण्यात आलेले भेसळयुक्त मसाले जप्त करून लोकांना या आरोग्यास होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्याचे प्रशासनापुढे आव्हान राहणार आहे.