क्वारंटाइन सेंटरमध्ये चक्क ‘ एक चतुर नार करके शृंगार ‘ : काय आहे पूर्ण बातमी ?

शेअर करा

लॉकडाऊनमुळे अनंत अडचणींचा सामना करत करोडो लोक मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आपल्या गावी पोहचले मात्र गावी पोहचताच बहुतांश जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. क्वारंटाइन सेंटरमधील लोक परिवारापासून दूर आहेतच मात्र आपल्याच गावच्या लोकांच्यासोबत राहायला असल्याने त्यांच्यासोबत का होईना, मात्र आपली करमणूक व्हावी म्हणून काहीतरी मनोरंजनाचे मार्ग शोधत आहेत . अशाच एका बिहारच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये प्रवाशांच्या आग्रहास्तव जेवण तयार करणाऱ्या तरुणाचा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील हा व्हिडीओ असून प्रवाशांचं मनोरंजन आणि हसवण्यासाठी त्यानं हा डान्स केला होता. त्यादरम्यान एकाने शूटिंग करून इंटरनेटवर टाकून दिला. या व्हिडिओमधील जबरदस्त डान्स करणाऱ्या व्यक्तीचे नाव रिंकू असल्याचे समजते.

क्वारंचाइन सेंटरमध्ये जेवण बनवणारा रिंकू एका लहान गावात हॉटेल चालवतो. क्वारंटाइन सेंटरमध्ये आचारी म्हणून काम करणारा रिंकू प्रवासी मजुरांना भोजन देण्याबरोबरच आपल्या डान्समुळे प्रसिद्ध झाला आहे. मजुरांच्या आग्रहास्तव या रिंकूनं ‘एक चतुर नार’ या गाण्यावर तुफान डान्स केला. त्याच्या या डान्सला मजूर आणि प्रवाशांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या डान्स आणि अभिनयाचा व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 600 हून अधिक लोकांनी पाहिलं आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रवासी आणि मजुरांना धीर देत त्यानं मनोरंजनही केलं आहे. रिंकू यांच्या डान्समुळे अनेकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि ते लवकर बरे होतील असं युझर्सनी म्हटलं आहे. या तरुणाचा डान्सला युझर्सनी तुफान प्रतिसाद दिला आहे.


शेअर करा