स्वतःची मिमिक्री पाहून कंगनाचा थयथयाट, भाषेची सोडली पातळी आणि म्हणाली की ? : पहा व्हिडीओ

शेअर करा

सातत्याने वाटेल ते बरळणाऱ्या कंगनाची डोके काही ठिकाण्यावर यायचे नाव घेत नाहीये. यावेळी ट्विट करत तिने दिलजीत दोसांज नाही तर सलौनी गौर हिला लक्ष्य केले आहे. सलौनी गौर एक कॉमेडियन आहे. या सलौनीने कंगनाची मिमिक्री केली आणि कंगना संतापली. वाचाळ कंगना फक्त चर्चेत राहावे म्हणून असले उद्योग करत असून तिला फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. सलौनीवर टीका करताना कंगनाने भाषेची पातळी देखील ओलांडली.

17 डिसेंबरला सलौनीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात ती कंगनाच्या गेटअपमध्ये आहे. तिची नक्कल करत, तिने हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला होता.कंगनाच्या चाहते हा व्हिडीओ पाहून भडकले होते तर काहींनी सलौनीच्या या व्हिडीओचे कौतुक केले होते. कंगनापर्यंत हा व्हिडीओ पोहोचला आणि ती भडकली. मग काय, संतापाच्या भरात तिने असे काही ट्वीट केले की, सगळेच हैराण झालेत.

संतापलेल्या कंगनाने भाषेची मर्यादा ओलांडताना म्हटले की, ‘येथे माझ्या पॉटीसाठीही एक बाजार आहे. तुझ्या लूक्सबद्दल मी बोलत नाहीये. तुझ्या सडक्या आणि घाणेरड्या विचारांबद्दल मी बोलतेय. हे म्हणजे माझ्या मलमूत्राची नक्कल करण्यासारखे आहे. यासाठी मी तुला पूर्ण मार्क देईल. लेजेंड्सची पॉटीही विकल्या जाते,’

गेल्या काही महिन्यांपासून कंगना सतत चर्चेत आहे. सगळ्यांसोबत पंगा घेत तिचा टिवटिवाट सुुरू आहे. यावरून कंगना ट्रोल होतेय, पण तिला त्याची पर्वा नाही. अलीकडे शेतकरी आंदोलनावरून कंगना व दिलजीत दोसांज यांच्या ट्वीटर वॉर रंगले होते. तेही सर्वांनी बघितलेच.स्वतः शेतकऱ्यांसाठी कंगनाने काय केले असे प्रश्न तिला स्वतःला देखील पडत नसावेत केवळ शेतकरी आंदोलनात सहभागी लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी सरकारच्या आशीर्वादाने कंगनासारख्या नट्या बरळत आहेत.


शेअर करा