‘ त्या ‘ दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश.. अल्पवयीन मुलीने केला होता मास्टरप्लॅन आणि …

शेअर करा

राज्यात गाजलेल्या त्या दुहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. बातमी मध्यप्रदेशातील असून इंदूरमधील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे. दोघांनाही रतलाम येथून अटक केली आहे. मुलीच्या आईवडिलांचा खून करून ते दोघेही राजस्थानला पळण्याच्या तयारीत होते.

आरोपींजवळील काही कपडे आणि १ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी मुलीचे वय १७ वर्षे असून ती अकरावीत शिकत असून धनंजय उर्फ डीजे असे तिच्या बॉयफ्रेंडचे नाव आहे. आरोपींनी आई-वडिलांच्या हत्येचा कट आधीच रचला होता. सकाळी मुलीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलावले त्यानंतर ती स्वतः घराबाहेर निघून गेली होती.

गुरुवारी ही घटना इंदूरच्या एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुक्मिणी नगरात घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. हत्या झालेली व्यक्ती ही मध्य प्रदेशच्या एसएएफमध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होती. ज्योतिप्रसाद शर्मा असे त्याचे नाव असून, नीलम असे त्यांच्या पत्नीचे नाव होते . बॉयफ्रेंडने सुरुवातीला तिच्या आईची हत्या केली. त्यानंतर वडिलांना ठार मारले.

हत्येच्या घटनेनंतर त्यांची १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसांना घरात एक चिठ्ठी मिळाली होती. या चिठ्ठीत मुलीने आपल्या पित्यावर गंभीर आरोप केले होते. वडील अत्याचार करत होते आणि आई त्यांना साथ देत होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून मी घर सोडून जात असल्याचे तिने चिठ्ठीत लिहिले होते. मुलगी बेपत्ता असल्याने तिच्यावर या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता.


शेअर करा