धार्मिक आधारावर व्यवसायांचे देखील विभाजन करण्याचा घाट भाजपने सध्या घातलेला असून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट करून अधिक माहिती दिलेली आहे. मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केला आहे.
मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मांस खरेदी करू नका, असे आवाहन देखील नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणेंच्या आवाहनामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
मंत्री नितेश राणे यांनी याबाबत ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस… आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम https://malharcertification.com या निमित्ताने सुरू झालेलं आहे.
आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 10, 2025
आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(https://t.co/fQAwGvAdca) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १००… pic.twitter.com/u0zdi2rjBt
मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं आवाहन यानिमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, हे निश्चित, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.