शिर्डीत मुलानेच बापाला संपवलं , जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढतेयं

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळखळजनक असे प्रकरण शिर्डीत समोर आलेले असून घरगुती कारणावरून मुलांनीच वडिलांना लोखंडी पाईपने मारहाण केली आणि त्यांची हत्या केली. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून या प्रकाराची नोंद झालेली होती मात्र पाच दिवसांनी हा खून असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , शुभम गोंदकर ( वय 29 वर्ष ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून न्यायालयाने त्याला 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी या संदर्भात माहिती दिली असून आरोपीने केलेल्या मारहाणीत त्याचे वडील दत्तात्रय शंकर गोंदकर ( वय 54 ) यांचा मृत्यू झाला. शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे . 


शेअर करा