श्रीगोंद्यात महाविद्यालयीन तरुणाचा खून , जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासाची सूत्रे आता..

शेअर करा

एक खळबळजनक अशी घटना श्रीगोंदा तालुक्यात समोर आलेली असून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आलेला आहे. खुनामागील कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नसून एका विहिरीत त्याच्या शरीराचे तुकडे करून दोन पोत्यांमध्ये भरून फेकून देण्यात आलेले होते. 

उपलब्ध माहितीनुसार , माऊली सतीश गव्हाणे ( वय 19 वर्ष ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. बारावीच्या पेपरला गेलेला माऊली पुन्हा घरी आलाच नाही.  पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली असून अद्यापपर्यंत कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. 

मृतदेहाच्या शिरावरून आणि त्याच्या कानात असलेल्या बाळीच्या रंगावरून हा मृतदेह माऊली गव्हाणे याचाच असल्याचे स्पष्ट झालेले असून त्याचा मृतदेह पाहताच त्याचे वडील सतीश गव्हाणे , आई मंगल यांना शोक अनावर झाला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा तपास आता अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवलेला आहे.

अहिल्यानगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत खैरे , कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यासोबत बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे , सुपा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली होती. 


शेअर करा