नगर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढलेले पाहायला मिळत असून रात्रीच्या वेळी पुण्यातून पाथर्डीकडे जात असताना झोप आली म्हणून केडगाव बायपासजवळ कार उभी करून झोपलेल्या एका दांपत्याला हत्याराचा धाक दाखवत लुटणाऱ्या दोन जणांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलेले आहे.
सदर घटना ही चार डिसेंबर 2024 रोजी घडलेली होती. रितेश सुरेश पटवा ( राहणार साईनाथ नगर तालुका पाथर्डी ) यांनी या घटनेसंदर्भात कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कारवाई करत पांडुरंग शिंदे आणि महेश मनाजी शिंदे ( दोघेही राहणार विळद तालुका अहिल्यानगर ) यांना अटक केलेली आहे.
आरोपी आकाश शिंदे याने सोने लुटल्यानंतर हे सोने बोल्हेगाव येथील एका सराफ व्यावसायिकाला विकलेले होते. पोलिसांनी त्याला देखील अटक केलेली असून लुटीतील तीन लाख 28 हजार रुपये किमतीचे सुमारे चार तोळे सोने पोलिसांनी जप्त केलेले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथकासह ही कारवाई केलेली आहे.