खासदार निलेश लंके यांनी संसदेत बोलताना ,’ अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ असून या जिल्ह्यात एकही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच रुग्णांना देखील उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जावे लागते त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे ,’ अशी मागणी केलेली आहे.
खासदार निलेश लंके यांनी ,’ मतदार संघातील ग्रामीण आणि आदिवासी भागात नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाही त्यामुळे उपचारासाठी गरिबांनी मध्यवर्ती मध्यमवर्गीय रुग्णांना पुणे संभाजीनगर आणि मुंबई येथे जावे लागते. त्यात पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होतो . अनेक जणांना हा खर्च परवडण्यासारखा देखील नाही त्यामुळे जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे अनिवार्य आहे ,’ असे म्हटलेले आहे.
निलेश लंके यांनी पुढे बोलताना , ‘ नगर दक्षिण मतदार संघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची मोठी कुचंबना होते. केंद्र आणि राज्य शासनाने या संदर्भात लवकरात लवकर पावले उचलावीत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे ,’ अशी मागणी केलेली आहे. खासदार निलेश लंके यांनी यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना देखील दिले.