औरंगजेबाने त्याची सत्ता असताना हिंदू बांधवांवर अनेक अत्याचार केले. मंदिरे पाडली, देशातील धर्मगुरूंना आणि राजांना यातना दिल्या. त्याची कबर ही गुलामीचे प्रतीक आहे त्यामुळे ही कबर काढावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नगर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी दिलेला आहे.
विश्व हिंदू परिषद , बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे काही पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर यासाठी मोर्चा आयोजित केलेला होता. विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती , शरद नगरकर , मुकुल गंधे , मिलिंद मोभारकर, विवेक कुलकर्णी , अनिल जोशी , साहिल पवार हे मोर्चात सहभागी झालेले होते.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलेले असून त्यामध्ये औरंगजेबाने त्याचे वडील , भाऊ आणि नातेवाईकांची पूर्ण हत्या करून सत्ता मिळवली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा त्याने क्रूर छळ केला . त्याचा मृत्यू अहिल्यानगरमध्ये झाला तर दफनविधी हा खुलताबाद येथे झाला. त्याची कबर गुलामीचे आणि यातनांची प्रतिक आहे त्यामुळे ती कबर काढण्यात यावी,’ अशी मागणी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलेली आहे.