शेवगावच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा आणखीन एक आरोपी गुजरातमधून ताब्यात 

शेअर करा

नगर जिल्ह्यात आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून शेवगाव तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालून फरार झालेल्या एका आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलेले आहे. शेवगाव जिल्ह्यातील शेअर मार्केट ट्रेडिंग घोटाळा सध्या राज्यात चर्चेचा झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , साईनाथ कल्याण कवडे ( वय 28 राहणार शेवगाव जिल्हा अहिल्यानगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमधून ताब्यात घेतलेले आहे. 

अवधूत केदार ( राहणार खंडोबा नगर शेवगाव ) यांनी साईनाथ कवडे याच्या कंपनीमध्ये काही पैसे गुंतवलेले होते. गुंतवणुकीवर तब्बल 12 टक्के व्याजदर मिळेल असे आमिष फिर्यादी यांना दाखवले मात्र काही कालावधीतच हा सर्व बनवेगिरीचा प्रकार असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. आतापर्यंत साईनाथ कवडे याच्या ट्रेडिंग कंपनीत अनेक जणांनी एक कोटी 61 लाख रुपये अडकवलेले असून फसवणूक केल्यानंतर तो गुजरातला पळून गेला होता. 

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाचे समांतर तपासाचे आदेश दिलेले होते. दिनेश आहेर यांनी आरोपीला पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आणि त्यानंतर आरोपी गुजरात इथे असल्याचे लक्षात येताच वेळ न दवडता तात्काळ कारवाई केली.


शेअर करा