प्रत्येक तरुणीमागे तीन लाख रुपये तसेच हॉटेलचा खर्च ग्राहकाकडून , अंकल ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटची संख्या वाढलेली पाहायला मिळत असून असाच एक प्रकार मुंबईतील अंधेरी येथे समोर आलेला आहे. चक्क टीव्ही सिरीयल मध्ये काम करणाऱ्या चार ऍक्टर तरुणींची पोलिसांनी सुटका केली असून एका वृद्ध इसमाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार,  शामसुंदर असे साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे नाव असून अंधेरीत श्यामसुंदर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांना याप्रकरणी माहिती मिळवली आणि त्यांनी कारवाईसाठी त्यांनी कंबर कसली. 

बोगस ग्राहक पाठवून संबंधित व्यक्तीकडे व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला आणि त्यानंतर त्याच्याकडे चार ऍक्टर तरुणींची मागणी करण्यात आली. आरोपीने प्रत्येक तरुणीमागे तीन लाख रुपये तसेच हॉटेलचा खर्च ग्राहकालाच करावा लागेल अशी माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 


शेअर करा