मुलाच्या खुन्यावर दोन वर्ष पाळत ठेवली अन संधी मिळताच.., महाराष्ट्रातील धक्कादायक घटना 

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी इथे समोर आलेली असून मुलाचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला दोन वर्षानंतर मुलाच्या वडिलांनी यमसदनी धाडले आहे.  यवतमाळ जिल्ह्यात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. 

यवतमाळ शहरात दोन वर्षांपूर्वी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला होता . आपल्या मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची माहिती मिळताच मयत मुलाच्या वडिलांनी खुन्याचा पाठलाग सुरू केला आणि त्यानंतर तलवारीने हल्ला करून मुलाच्या मारेकऱ्याला ठार केले. शनिवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडलेली आहे. 

ओम गजानन बुटले (२५) असे मृताचे नाव आहे. ओमने दोन वर्षांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत वाद घालून अजय अवधूत तिगलवाड (२२, रा. कोळवन) या युवकाचा खून केला होता आणि त्यानंतर जामिनावर बाहेर आला.  आपल्या मुलाचा कुठलेही कारण नसताना ओम याने हकनाक बळी घेतला याची खंत अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड (५०) यांना होती. 

मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचे नाही, या मानसिकतेतून अवधूत हा ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता. पुणे येथे जाण्यासाठी सनराईज शाळेसमोर ओम उभा होता आणि याचवेळी अवधूत याने ओमवर तलवारीने वार केले त्यात ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला, आर्णी ठाणेदार सुनील नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली व या प्रकरणात इतरही तिघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. 


शेअर करा