बीड जिल्ह्यातील मशिदीत स्फोट घडवणारे दोघेही ताब्यात , आरोपीचा आणखीन एक कारनामा समोर

शेअर करा

बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील एका मशिदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदैवाने या प्रकारात कुणालाही कोणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी धार्मिक वाद चिघळू नये यासाठी पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वैयक्तिक वादातून दोन तरुणांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील अर्धमसला गावातील मशिदीत शनिवार/रविवारी मध्यरात्री हा स्फोट झाला. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास जिलेटिनच्या कांड्या ठेवून स्फोट उघडवून आणल्यामुळे मशिदीची भिंत कोसळली तसेच मोठा खड्डाही पडला. सदर घटनेमुळे  गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी आयजी, पोलीस अधीक्षकांसह तलवाडा पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे अशी दोन्ही आरोपींची नावे असून स्फोट घडवण्यापूर्वी विजय गव्हाणे याने सोशल मीडियावर जिलेटीनच्या कांड्यासह स्वत:चा व्हिडिओ पोस्ट केला होता. हातात जिलेटिनच्या काठ्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता. उद्या रमजान ईद असल्यामुळे मुस्लिम समुदायाला शांत राहण्याचे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे. 

वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावातील सर्वधर्मीय बांधवांनी केलेली आहे. घटनेची माहिती मिळताच बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी व्हिडीओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केला असून तपास सुरु आहे. 


शेअर करा