‘ताडी’ चा एक एक थेंब गंगेच्या पाण्याहून शुद्ध आणि पवित्र, पहा कोण बरळले ?

शेअर करा

ब्रिटनसह काही देशांमध्ये कोरोनाच्या विषाणूचे नवे स्वरूप आढळल्यानंतर जगभरात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भारतात नव्या प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या अधिक काळजीपूर्वक कराव्या लागतील, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले आहे मात्र कोरोनाच्या संकटादरम्यान उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष भीम राजभर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे .

उत्तर प्रदेशातील बलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बहुजन समाज पक्षाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, ‘ नागरिकांनी देशी दारु ‘ताडी’ जास्त प्रमाणात घेतली तर ते कोरोनापासून स्वत:चं संरक्षण करू शकतात. ‘ताडी’चा एक एक थेंब गंगेच्या पाण्याहून शुद्ध आणि पवित्र आहे. ‘ताडी’मुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते वाढत असल्याचा अजब गजब दावाही भीम राजभर यांनी केला आहे.

‘ताडी’ कोरोनापासून वाचण्यासाठी कशी मदत करू शकते, याचं मात्र कोणतंही प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय पुरावा भीम राजभर यांना देता आलेला नाही. त्यामुळे भीम राजभर यांच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे तसेच हिंदू धर्मीयांसाठी पवित्र अशा गंगा नदीच्या पाण्याची ताडीशी तुलना केल्यामुळे या मुद्द्यावर राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत .

गेले अनेक दिवस संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे. गेल्या २४ तासात देशात फक्त १९ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कारण देशात आतापर्यंत १ कोटी ७५ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासात देशात १९,५५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात ३०१ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात २ लाख ९२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोना विषाणूच्या रुपानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार, यूकेहून येणाऱ्या प्रवाशांपैंकी नव्या करोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. करोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. तसेच युनायटेड किंगडमहून भारतात येणाऱ्या सगळ्या विमानांना २२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पासून ते ३१ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत स्थगिती देण्यात आली असून संभाव्य धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले पाऊल महत्वाचे मानले जात आहे.

कोव्हिड १९ विषाणूचं हे नवं रुप दक्षिण – पूर्व इंग्लंड तसंच लंडनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळताना दिसतंय. ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. तसंच यामुळे ब्रिटनमध्ये करोना संक्रमणाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची कबुली स्थानिक आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी दिली असून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये लॉकडाउनची घोषणा केली आहे. ब्रिटननंतर भारतात देखील शिरकाव होण्याची शक्यता असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे .


शेअर करा