लाईटस.. कॅमेरा.. ॲक्शन , वाल्मीक कराड याचा नवीन कारनामा आला समोर 

शेअर करा

संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि खंडणी प्रकरणातील आरोपी मास्टरमाइंड वाल्मीक कराड हा बीड जिल्ह्यात पालकमंत्री असल्यासारखाच फिरत असायचा आणि त्यातून विविध क्षेत्रात त्याची चांगलीच ओळख झालेली होती. 

वाल्मीक कराड हा इंडियन मोशन पिक्चर प्रोडूसर असोसिएशनचा कायम सभासद असल्याची नवीन माहिती समोर आलेली आहे , याच सभासदत्वाचा फायदा घेत वेगवेगळे अभिनेते आणि अभिनेत्री यांना कार्यक्रमासाठी आणण्याची देखील भूमिका तो पार पाडत असायचा.वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे


शेअर करा