कंगनाच्या बिकिनी ‘ लूक ‘ वरून ‘ भक्त विरुद्ध कंगना ‘ समोरासमोर, कंगना म्हणते की .. ?

शेअर करा

मुंबई: . कंगनानं बिकीनी लूकमधील एक फोटो शेअर केला असून तिच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया आणि लाइक्सचा पाऊस पडला आहे मात्र अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.सातत्याने बेताल वक्तव्य आणि वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली असून तिच्या बिकिनी लूकमुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

कंगनानं मॅक्सिकोमधील बेटावर काढलेला बिकीनीतील फोटो शेअर केला आहे. ‘ मित्रांनो सुप्रभात. मला आवडेल्या आणि सुंदर असलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण हे मॅक्सिकोत आहे. मॅक्सिकोतील एका बेटावर निवांतक्षणी काढलेला हा फोटो’, असं कंगनानं तिच्या फोटोच्य कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.मात्र सातत्याने संस्कार आणि संस्कृतीबद्दल गप्पा मारणाऱ्या कंगनाचा हा बिकीनी लूक अनेक जणांना आवडला नाही. काहींनी तिला भारतीय संस्कृती आठवण करून दिली तर काहींनी तिला संस्काराबद्दल प्रश्न विचारले. हिच का हिंदू संस्कृती? तुझे संस्कार विसरलीस का?असे टोले तिला नेटकऱ्यांनी लगावले आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1341580240062087168

एका ट्रोलर्सने कंगनाच्या या फोटोवर लिहले आहे की, तुमच्याकडे काही कपडे शिल्लक नाहीत का? तर दुसर्‍याने लिहिले की, आता हेच आयुष्यात राहिले आहे. जगाला सांगा की, आपण किती सभ्य आहात आणि भक्तांना सांगा की, तुम्ही किती देसी आहात. असेही तुमच्याकडे कुठलाच चित्रपट नाही. त्याच वेळी एकाने लिहिले संस्कारी क्वीन, काही लोक कंगनाला देवाकडून बुध्दी देण्याचीही मागणी करीत आहेत. एक ट्रोलर्स म्हणाला की, आम्ही तुमचे समर्थन करतो, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या संस्कृतीच्या विरोधात जा, थोडेसे लाजा तर दुसरा ट्रोलर्स म्हणतो की, देवा हिला थोडी अक्कल द्या.

दरम्यान ट्रॉल झाल्यानंतर कंगना देखील भडकली असून तिने देखील चाहत्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या बिकिनीवरील फोटोवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगना राणौतने चोख उत्तर दिले आहे. कंगनाने, तिला सनातन धर्माची शिकवण देणाऱ्यांना उत्तर देताना लिहिले आहे, ‘काही लोक माझा बिकिनी पिक्चर पाहून मला धर्म आणि सनातनचे लेक्चर देत आहेत. जर कधी मां भैरवी केस खुले करून, निर्वस्त्र, रक्त पिणाऱ्या रुपात समोर आली तर तुमचे काय होईल? तुमची तर फाटेलच आणि स्वतःला भक्त म्हणवता? धर्माच्या मार्गावर चाला, त्याचे ठेकेदार बनू नका…. जय श्री राम.’ याच बरोबर तिने आपला आणखी एक फोटोही शेअर केला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1341700974751051777

काही दिवसांपूर्वी, शेतकरी आंदोलनासंदर्भात एक ट्विट करत कंनाना म्हणाली होती, की काही लोक याचा फायदा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या शिवाय एका ट्विटमध्ये तिने पंजाबच्या एका वृद्ध महिलेला शाहीन बागची आजी असल्याचा उल्लेख केला होता. हे ट्विट तिने नंतर डिलिटही केले होते. मात्र, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या ट्विटवरून तिला दोन कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.


शेअर करा