माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी केलेली होती त्यावर आमदार शिवाजी कर्डिले यांनी मिश्किल भाष्य करत ,’ डॉक्टर सुजय विखे यांना लवकरच आम्ही आजी करणार आहोत मात्र त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवू केंद्रात पाठवल्यानंतर ते राज्यात येऊ नयेत अशी आमची इच्छा आहे कारण राज्यात ते आल्यावर आमचे मंत्रीपद अडचणीत येईल ,’ असे म्हटलेले आहे.
अकोळनेर येथील एका धार्मिक कार्यक्रमात शिवाजी कर्डिले बोलत होते त्यावेळी त्यांनी डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या राजकीय पुनर्वसनाबद्दल स्वतःचे मत व्यक्त केले. कर्डिले म्हणाले की ,’ आमच्या मंत्रीपदाला अडचणीचे ठरू नये यासाठी डॉक्टर विखेंचे पुनर्वसन राज्यातील राजकारणापेक्षा आम्ही केंद्रात करणार आहोत कारण राज्यातील राजकारणापेक्षा केंद्रातील राजकारणात विखे जास्त चांगले आहेत.’
शिवाजी कर्डिले पुढे म्हणाले की ,’ सुजय विखे पाटील हे राजकारणातील फर्डे वक्ते आहेत. त्यांची अनेक विधाने वादग्रस्त ठरत असली तरी ते खरे तेच बोलतात . त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत ,’ असेही शिवाजी कर्डिले पुढे म्हणाले.