नगर तालुक्यात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून तालुक्यातील वाळुंज येथील सरपंच पुत्राला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मकरंद गोरखनाथ हिंगे ( वय 40 वर्ष राहणार वाळुंज तालुका अहिल्यानगर ) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात बांधकाम ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली होती.
ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या ब्लॉकचे काम पूर्ण करण्यात आले आणि पूर्णत्वाचा दाखला ग्रामपंचायत इकडून अपेक्षित होता त्यासाठी मकरंद हिंगे याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. फिर्यादी यांनी त्यानंतर तडजोड करत 45 हजारावर व्यवहार ठरवला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला.
अहिल्यानगर येथील पथकाने त्यानंतर बुरुडगाव रोडवरील अहिंसा चौक येथे सापळा रचला आणि लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपये घेताना मकरंद याच्यावर कारवाई केली. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे.