नगर परिसरातील लष्कराने बंद केलेले ‘ हे ‘ रस्ते खुले होण्याची चिन्हे , खासदार निलेश लंके यांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट 

शेअर करा

खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर शहरातील संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणारे अनेक रस्ते गेल्या काही वर्षांपूर्वी खुले होते मात्र सध्या ते बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे नागरिकांची प्रचंड अडचण होत असून हे रस्ते पुन्हा खुले करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केलेली आहे. 

दरेवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांनी बंद केलेले रस्ते खुले करण्यासंदर्भात निलेश लंके यांच्याकडे मागणी केलेली होती त्यानंतर निलेश लंके यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन हे रस्ते खुले करण्याची मागणी केली. 

न्यायालयाच्या इमारतीपासून भुईकोट किल्ल्याकडे जाणारा रस्ता, नटराज हॉटेलपासून कॉन्व्हेंट स्कूल कडे जाणारा रस्ता , दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता आणि इतर अनेक रस्ते संरक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे नागरिकांना प्रचंड लांब वळसा घालून इच्छित ठिकाणी पोहोचावे लागते. खासदार निलेश लंके यांची भेट घेऊन अनेक नागरिकांनी हे रस्ते खुले करण्याची मागणी केलेली होती त्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिलेले आहे .


शेअर करा